Photos | हार्दिक आणि नताशासोबत मुलगा अगस्त्यची स्विमिंग पूलमध्ये धमाल

टीम इंडियाचा शिलेदार हार्दिक पांड्या, त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोव्हिक सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात.

1/5
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya) त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे चर्चेत असतोच परंतु त्याच्या पत्नीसोबतच्या अनेक रोमँटिक फोटोंमुळेही तो अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याची पत्नी नताशा स्टेनकोव्हिकने (Natasa Stankovic) स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर नुकताच शेअर केला होता. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनाही विशेष भावली.
2/5
आता या जोडप्याने त्यांचा मुलगा अगस्त्यसोबतचे स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. पंड्या दाम्पत्य आणि बेबी अगस्त्यने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
3/5
हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे, तर कधी बेबी अगस्त्यसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.
4/5
नताशाने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिच्यासोबत हार्दिक आणि बेबी अगस्त्य दिसत आहे. नताशाने हा फोटो स्टोरीला पोस्ट करत चाहतांना या फोटोलो चांगलं कॅप्शन सूचवायला सांगितलं आहे.
5/5
काही दिवसांपूर्वी चिमुकला अगस्त्य स्विमिंग पूलमध्ये उतरला होता, अगस्त्यचे या स्विमिंग पूलमधील फोटो हार्दिक आणि नताशाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाल्यानंतर आज पुन्हा एकदा नताशाने अगस्त्यचे स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले आहेत.