RR vs SRH IPL 2021 Match 28 | राजस्थानचा सनरायजर्स हैदराबादवर 55 धावांनी ‘रॉयल’ विजय

| Updated on: May 02, 2021 | 7:26 PM

RR vs SRH 2021 Live Score Marathi | राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने

RR vs SRH IPL 2021 Match 28 | राजस्थानचा सनरायजर्स हैदराबादवर 55 धावांनी 'रॉयल' विजय
RR vs SRH 2021 Live Score Marathi | राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने

नवी दिल्ली | राजस्थान रॉयल्सने (Rajastha Royals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 55 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 165 धावाच करता आल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने 31 तर जॉनी बेयरस्टोने 30 धावांची खेळी केली. राजस्थानकडून मुस्तफिजुर रहमान आणि ख्रिस मॉरीसने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. या मॅचचे आयोजन नवी दिल्लीतील (Arun Jaitley Stadium) अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले होते. (rr vs srh live score ipl 2021 match rajasthan royals vs sunrisers hyderabad scorecard online arun jaitley stadium delhi in marathi)

Key Events

जोस बटलरचे शानदार शतक

राजस्थानकडून जोस बटलरने 124 धावांची शानदार शतकी खेळी केली. बटलरने 64 चेंडूत 11 चौकार आणि 8 सिक्ससह 124 धावांची वादळी खेळी केली. त्यासोबतच कर्णधार संजू सॅमसनने 48 रन्स केल्या

राजस्थानची IPL 2021 मधील आतापर्यंतची कामगिरी

राजस्थानने हैदराबादला पराभूत करत तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. यासह राजस्थानने पॉइंट्सटेबलमध्ये 7 व्या क्रमांकावरुन 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थानच्या नावावर 7 सामन्यात 4 पराभव आणि 3 विजयासह 6 गुणांची नोंद आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 02 May 2021 07:18 PM (IST)

    राजस्थानची हैदराबादवर 55 धावांनी मात

    राजस्थानने हैदराबादवर 55 धावांनी मात केली आहे. राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले होते. पण हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 165 धावाच करता आल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने 31 तर जॉनी बेयरस्टोने 30 धावांची खेळी केली. राजस्थानकडून मुस्तफिजुर रहमान आणि ख्रिस मॉरीसने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

  • 02 May 2021 07:04 PM (IST)

    हैदराबादला आठवा धक्का

    हैदराबादने आठवी विकेट गमावली आहे. राशिद खान भोपळा न फोडता तंबूत परतला आहे.

  • 02 May 2021 07:03 PM (IST)

    हैदराबादला सातवा धक्का

    हैदराबादने केदार जाधवच्या रुपात सातवी विकेट गमावली आहे. जाधवने 19 धावांची खेळी केली.

  • 02 May 2021 07:02 PM (IST)

    हैदराबादला सहावा झटका

    हैदराबादला सहावा झटका बसला आहे. अब्दुल समद 10 धावांवर आऊट झाला आहे.

  • 02 May 2021 06:45 PM (IST)

    हैदराबादला पाचवा झटका

    हैदराबादला पाचवा झटका लागला आहे.  मोहम्मद नबी 17 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 02 May 2021 06:44 PM (IST)

    मोहम्मद नबीचे 2 खणखणीत सिक्स

    मोहम्म्द नबीने 14 व्या ओव्हरमध्ये  राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर 2 खणखणीत सिक्स लगावले आहेत.

  • 02 May 2021 06:38 PM (IST)

    हैदराबादला मोठा झटका

    हैदराबादला मोठा झटका लागला आहे.  कर्णधार केन विलियमनस 21 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 02 May 2021 06:35 PM (IST)

    हैदराबादचा 12 ओव्हरनंतर स्कोअर

    हैदराबादने 12 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. मैदानात  कर्णधार केन विलियमसन आणि केदार जाधव खेळत आहेत. हैदराबादला विजयासाठी 8 ओव्हरमध्ये आणखी 121 धावांची गरज आहे.

  • 02 May 2021 06:27 PM (IST)

    हैदराबादला तिसरा झटका

    हैदराबादने तिसरी विकेट गमावली आहे. विजय शंकर आऊट झाला आहे. शंकरने 8 धावा केल्या. 
     
     
  • 02 May 2021 06:14 PM (IST)

    हैदराबादला दुसरा झटका

    हैदराबादने दुसरी विकेट गमावली आहे. जॉनी बेयरस्टो कॅच आऊट झाला आहे. बेयरस्टोने 30 धावांची खेळी केली.
  • 02 May 2021 06:08 PM (IST)

    हैदराबादला पहिला धक्का

    हैदराबादने पहिली विकेट गमावली आहे. मनिष पांडे आऊट झाला आहे. मुस्तफिजुर रहमानने मनिषला 31 धावांवर बोल्ड केलं.

  • 02 May 2021 06:05 PM (IST)

    हैदराबादचा पावर प्लेनंतर स्कोअर

    हैदराबादने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 57 धावा केल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी 84 चेंडूत आणखी 164 धावांची आवश्यकता आहे.

  • 02 May 2021 06:00 PM (IST)

    हैदराबादच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

    सनरायजर्स हैदराबादच्या जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडे सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 02 May 2021 05:55 PM (IST)

    हैदराबादची शानदार सुरुवात

    विजयी धावांचे पाठलाग करताना हैदराबादची शानदार सुरुवात झाली आहे. जॉनी बेयरस्टो-मनिष पांडे सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये बिनबाद 46 धावा केल्या आहेत.

  • 02 May 2021 05:33 PM (IST)

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 221 धावांची आवश्यकता

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टो सलामी जोडी मैदानात खेळत आहे. हैदराबादला  विजयासाठी 221 धावांची आवश्यकता आहे.

  • 02 May 2021 05:19 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे तगडे आव्हान

    राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. राजस्थानकडून सर्वाधिक 124 धावा सलामीवीर जॉस बटलरने केल्या. तर संजू सॅमसनने 48 धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि विजय शंकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 02 May 2021 05:11 PM (IST)

    राजस्थानला तिसरा धक्का

    राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. शतकवीर जॉस बटलर आऊट झाला आहे. बटलरने 64 चेंडूत 11 चौकार आणि 8 सिक्ससह 124 धावांची झंझावाती खेळी केली.

  • 02 May 2021 05:08 PM (IST)

    जोस बटलरचा सिक्स, राजस्थान 200 पार

    जोस बटलरने 19 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर संदीप शर्माच्या बोलिंगवर सिक्स लगावला. यासह राजस्थानने 200 धावांचा टप्पा ओलांडला.

  • 02 May 2021 05:04 PM (IST)

    जॉस बटलरचे अफलातून शतक

    राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने 56 चेंडूत अफलातून शतक लगावलं आहे. जोसच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. जोस या मोसमात संजू सॅमसन, देवदत्त पडीक्कलनंतर शतक लगावणारा तिसरा शतकवीर ठरला.

  • 02 May 2021 04:58 PM (IST)

    राजस्थानला दुसरा झटका

    राजस्थानला दुसरा झटका बसला आहे. कर्णधार संजू सॅमसन कॅच आऊट झाला आहे. संजूने 48 धावांची खेळी केली.

  • 02 May 2021 04:49 PM (IST)

    15 व्या ओव्हरमधून 21 धावा

    राजस्थान रॉयल्सने 15 व्या ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या आहेत. यामध्ये जॉस बटलरने 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. तर संजू सॅमसनने 1 धाव काढली.

  • 02 May 2021 04:47 PM (IST)

    जॉस बटलर-संजू सॅमसन जोडीची शतकी भागीदारी

    जॉस बटलर आणि संजू सॅमसन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी अवघ्या 68 चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी 100 धावा जोडल्या.  राजस्थानचा 14 ओव्हरनंतर 1 विकेट 125 रन असा स्कोअर झाला आहे. 

     
     
     
  • 02 May 2021 04:36 PM (IST)

    सिक्स खेचत जोस बटलरचे शानदार अर्धशतक

    जोस बटलरने सामन्यातील 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला. यासह बटलरने 39 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केलं.
     
  • 02 May 2021 04:24 PM (IST)

    राजस्थानचा 10 ओव्हरनंतर स्कोअर

    राजस्थानने 1 विकेट गमावून 10 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या आहेत. जोस बटलर 32 आणि संजू  सॅमसन 25 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 02 May 2021 04:22 PM (IST)

    मनिष पांडेकडून संजू समॅसनला जीवनदान

    मनिष पांडेने संजू सॅमसनला 23 धावांवर जीवनदान दिले आहे. संदीप शर्मा सामन्यातील 10 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर संजूने शॉट मारला. संजूने मारलेला चेंडू मनिषच्या दिशेने गेला. मात्र मनिषने सोप्पा कॅच सोडला.

  • 02 May 2021 04:14 PM (IST)

    राजस्थानची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    जोस बटलर-संजू सॅमसन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. अवघ्या 31 चेंडूंच्या मदतीने या दोघांनी ही भागीदारी केली आहे.

  • 02 May 2021 04:05 PM (IST)

    राजस्थानचा पावर प्लेनंतरचा स्कोअर

    राजस्थान रॉयल्सने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 42 धावा केल्या आहेत. संजू सॅमसन 8* आणि जोस बटलर 17 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 02 May 2021 03:52 PM (IST)

    संजू सॅमसनचा जोरदार सिक्स

    संजू सॅमसनने षटकार ठोकत सुरुवात केली. संजूने खलील अहमदच्या गोलंदाजीवर चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सिक्स लगावला.

  • 02 May 2021 03:46 PM (IST)

    राजस्थानला पहिला धक्का

    राजस्थानने पहिली विकेट गमावली आहे. युवा यशस्वी जयस्वाल एलबीडब्ल्यू आऊट झाला. राशिद खानने जयस्वालला आऊट केलं. यशस्वीने 12 धावा केल्या.

  • 02 May 2021 03:33 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगला सुरुवात

    राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. जोस बटलर-यशस्वी जयसवाल सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 02 May 2021 03:28 PM (IST)

    अनुज रावतचे आयपीएल पदार्पण

    राजस्थान रॉयल्सकडून युवा अनुज रावतने पदार्पण केलं आहे. त्याला सामन्याआधी राजस्थानची कॅप देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं. या सर्व प्रकाराचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

  • 02 May 2021 03:22 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सचे अंतिम 11 खेळाडू

    संजू सैमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, अनुज रावत, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकरिया आणि कार्तिक त्यागी.

  • 02 May 2021 03:21 PM (IST)

    सनरायजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

    केन विलियमसन (कर्णधार), जॉनी बेयरेस्टो (विकेटकीपर), विजय शंकर, केदार जाधव, मनीष पांडे, अब्दुल समद, राशिद खान, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, खलील अहमद आणि भुवनेश्वर कुमार.

  • 02 May 2021 03:07 PM (IST)

    हैदराबादने टॉस जिंकला

    सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार केन विलियमसनने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान पहिले बॅटिंग करणार आहे.

  • 02 May 2021 02:59 PM (IST)

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज (2 मे) दुहेरी थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Published On - May 02,2021 7:18 PM

Follow us
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.