स्मृती मानधनाचा पलाशला आणखी एक सर्वात मोठा धक्का… आधी लग्न रद्द केले आणि आता… पायाखालची जमीनच…
Smriti Mandhana Wedding Called Off : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने धक्कादायक निर्णय घेत लग्न रद्द केल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. गेल्या काही दिवसांपासून स्मृती मानधना हिच्या लग्नाबद्दल विविध चर्चा सुरू होत्या.

भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणारे होते. विशेष म्हणजे हळद आणि संगीताचा कार्यक्रम जोरदार पद्धतीने पार पडला. संपूर्ण भारतीय संघ स्मृती मानधना हिच्या लग्नाच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसला. हेच नाही तर स्मृती हिच्यासाठी खास व्हिडीओही त्यांनी तयार केला होता. मात्र, संगीत आणि हळदीनंतर स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. पलाश मुच्छल याचे काही स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. स्मृती मानधना हिला पलाश धोका देत असल्याचे त्या स्क्रीनशॉर्टवरून दिसत होते. यामुळे तिने लग्न पुढे ढकलल्याचा दावाही करण्यात आला. यावर कुटुंबियांकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाहीत .
अखेर स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पलाश मुच्छल याच्यासोबतचे लग्न रद्द करत असल्याचे जाहीर केले. मात्र, तिने या पोस्टमध्ये लग्न नेमके कोणत्या कारणामुळे रद्द करत आहे हे सांगितले नाही. मात्र, आयुष्यात पुढे जाणार असल्याचा उल्लेख तिने आवर्जुन केला. यावरून लग्न फक्त वडिलांच्या तब्येतीच्या कारणामुळे पुढे ढकलले नसल्याचे स्पष्ट झाले. फक्त हेच नाही तर स्मृती मानधना हिच्या पोस्टनंतर पलाश यानेही धक्कादायक निर्णय घेतला.
स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्ट केले की, लग्न रद्द करत आहे. त्यानंतर पलाश मुच्छल याला तिने थेट सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. यावरून दोघांमधील वाद थेट पुढे आला असून अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याच निर्णय घेतला होता. पलाश याने स्मृती मानधना हिला लग्नासाठी अत्यंत खास पद्धतीने स्टेडियममध्ये जात प्रपोज केला होता, ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.
हळद आणि मेहंदीनंतर स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न पुढे ढकलले. त्यामध्येच आता स्मृती मानधना हिने स्पष्टपणे आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आपण लग्न रद्द करत आहोत. स्मृती मानधना हिने पलाशला पोस्टनंतर अनफॉलो केले. मात्र, स्मृती मानधना हिच्या पोस्टवर पलाश याने भाष्य करणे पूर्णपणे टाळल्याचे दिसत आहे. स्मृती मानधना हिच्या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
