धोनीचा काळ संपला, संघाने त्याला सन्मानाने निरोप द्यावा : सुनिल गावस्कर

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा काळ संपला आहे. संघाने आता त्यांना विश्वचषक जिंकवून देणाऱ्या माजी कर्णधाराचा विचार सोडून पुढचा विचार करायला हवा (Sunil Gavaskar on Dhonis Retirement). आता टीम मॅनेजमेंटला धोनीच्या नंतरचा विचार करायला हवा, असा सल्ला गावस्कर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीला दिला.

धोनीचा काळ संपला, संघाने त्याला सन्मानाने निरोप द्यावा : सुनिल गावस्कर

मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्‍कर (Sunil Gavaskar) यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धेनीबाबत (MS Dhoni Retirement) एक खळबळजनक वक्तव्य केलं. त्यांच्यामते, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा काळ संपला आहे. संघाने आता त्यांना विश्वचषक जिंकवून देणाऱ्या माजी कर्णधाराचा विचार सोडून पुढचा विचार करायला हवा (Sunil Gavaskar on Dhonis Retirement). आता टीम मॅनेजमेंटला धोनीच्या नंतरचा विचार करायला हवा, असा सल्ला गावस्कर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीला दिला.

“आपल्याला आता  पुढील विचार करायला हवा. धोनी आता संघात बसत नाही. माझ्या संघात तरी तो बसत नाही. जर तुम्ही टी-20 विश्वचषकाबाबत (t-20 World Cup 2020) बोलत आहात, तर मी रिषभ पंतचा विचार करेन. मी संजू सॅमसनबाबत विचार करेन. जर आपण टी-20 विश्वचषकबाबत विचार करत आहोत, तर मी तरुण खेळाडुंबाबत विचार करेन. कारण, आता आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. धोनीबाबत माझ्या मनात आदर आहेच आणि मला वाटतं की त्याला संघातून बाहेर करण्याआधी चांगल्यापद्धतीने निरोप दिला जावा”, असं सुनिल गावस्कर म्हणाले.

हेही वाचा : पुढे संधी मिळणार नाही हे धोनीला सांगा; सेहवागचा निवड समितीला सल्ला

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेसाठीही धोनीची निवड करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घ्यायची आहे, हे धोनीला माहीत आहे, असं मुख्य निवडकर्ता एम.एस.के. प्रसाद यांनी सागंतिलं होतं. तर प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि कर्णधार विराट केहलीनेही (Captain Virat Kohli) निवृत्ती घेण्याचा निर्णय धोनीवर सोडला आहे.

आता सुनील गावस्कर यांनी थेट धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केल्याने पुन्हा एकदा धोनीच्या विवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. यावर ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा धोनी काय उत्तर देणार, धोनी खरंच निवृत्ती घेणार का? याकडे सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. मात्र, धोनीने अद्यापही त्याच्या निवृत्तीबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही.

संबंधित बातम्या :

IND vs SA: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

विराटचा भावूक फोटो, धोनीने क्रिकेटला अलविदा केल्याचे संकेत?

आर्मी ट्रेनिंगवरुन परतल्यानंतर धोनी काय करतोय?

मॅच फिनिशर धोनी सध्या काश्मीरमध्ये आहे, Article 370 वर मजेदार मीम्स

सॅल्युटच्या स्टाईलने जगभरात चर्चेत असणाऱ्या खेळाडूचा धोनीला सलाम

युवा खेळाडूंना संधी देण्यासाठीच आम्हाला संघाबाहेर काढलं ना? गंभीरचं धोनीवर टीकास्त्र

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *