Google Search | गुगल असते तुमच्या मागावर, बारीक नजर तुमच्या ऑनलाईन हालचालीवर, लावा असे ब्रेक

Google Search | Google युझर्स मोबाईल, लॅपटॉपवर काय करतो, काय पाहतो, कोणता कंटेंट वाचतो, कोणते व्हिडिओ पाहतो, याची इत्यंभूत माहिती गुगल ट्रॅक करते. त्याआधारे, अलगोरिधम आधारे त्या व्यक्तीला जाहिराती दिसतात. त्याला त्याच्या आवडीनुसार, कंटेंट दिसत असतो. गुगलची ही हेरगिरी तुम्हाला थांबविता येऊ शकते.

Google Search | गुगल असते तुमच्या मागावर, बारीक नजर तुमच्या ऑनलाईन हालचालीवर, लावा असे ब्रेक
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 4:04 PM

नवी दिल्ली | 31 January 2024 : तुम्ही Google जसे लॉग-इन करता, तेव्हा, या प्लॅटफॉर्मवर आपोआप तुमचा सारा डेटा स्टोअर सुरु करणे सुरु करते. तुमची ब्राऊझिंग हिस्ट्री असो वा गुगल मॅप्स लोकेशन असो वा YouTube वरील तुमची व्हिडिओची हिस्ट्री, गुगलकडे सर्व डेटा स्टोअर होतो. याच डेटाच्या आधारावर गुगल तुम्हाला Ads डिस्प्ले आणि तुमची आवडती वेब सीरीज सूचवते. तुम्ही जे पाहता, वाचता, त्यासंबंधीचा कंटेंट तुम्हाला दिसतो. म्हणजे एकप्रकारे गुगल तुमच्यावर लक्ष ठेवते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तुमची माहिती ट्रॅक करते. गुगलची ही हेरगिरी तुम्हाला बंद करता येते, कसे ते पाहा..

पुश नोटिफिकेशनमधून हेरगिरी

गुगलवर अनेक युझर्संनी यापूर्वी सुद्धा हेरगिरी करण्याचा आरोप लावला. अमेरिकन सीनेटर रॉन विडेन (Ron Wyden) यांनी याचे खापर सरकारवर फोडले. त्यांनी सरकारचा गुगलला पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. त्यांनी न्याय विभागाला एक पत्र लिहिले. त्यात गुगल पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचा आरोप लावण्यात आला होता. पुश नोटिफिकेशन हा एक पॉप अप मॅसेज आहे. होम स्क्रीनवर नवीन मॅसेज आल्यावर तो युझर्सला अलर्ट देतो. यामाध्यमातून वापरकर्त्याची हेरगिरी करता येते.

हे सुद्धा वाचा

Activity Data करा चेक

  • सर्वात अगोदर Google वर जा
  • त्यानंतर उजव्या कॉर्नरवर तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा
  • Manage your Google account’ वर क्लिक करा
  • आता Data & Personalization अंतर्गत एक्टिव्हिटी कंट्रोल पॅनल दिसेल
  • त्यानंतर Activity and timeline अंतर्गत My Activity वर क्लिक करा

तुमचा डेटा ट्रॅक करण्यापासून थांबवा

  1. तुम्हाला इमेज आयकॉनच्या मदतीने Manage your Google account वर जा
  2. Data & Personalization अंतर्गत एक्टिव्हिटी कंट्रोल पॅनल दिसेल
  3. Web & App activity tracking, Location History, YouTube History बघा
  4. या सर्वांच्या समोर एक चेकमार्क्स दिसेल, त्यावर आता क्लिक करा
  5. ट्रॅकिंग थोपविण्यासाठी या टॉगलला बंद करावे लागेल

गुगल स्टोअरचा डेटा असा करा डिलीट

  • सर्वात अगोदर गुगलवर जा
  • राईट इमेजवर Manage your Google account वर क्लिक करा
  • Manage your Google account अंतर्गत एक्टिव्हिटी कंट्रोल पॅन दिसेल
  • डाव्या बाजूच्या Data & Personalization/Privacy वर क्लिक करा
  • Web & App Activity वर पुन्हा Manage Activity वर क्लिक करा
  • या ठिकाणी तुम्हाला मागील एक्टिव्हिटीची एक यादी दिसेल, ती डिलेट करा
Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.