AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Moto G86 Power 5G: दमदार बॅटरी व कॅमेऱ्यासह भारतात लाँच झाला हा फोन, जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स

Motorola Moto G86 Power 5G स्मार्टफोन 20,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा नवीनतम स्मार्टफोन पॉवरफुल बॅटरी, उत्तम AMOLED स्क्रीनसह अनेक उत्तम फिचर्स यात देण्यात आले आहेत. चला तर मग या फोनच्या विक्रीची तारीख, किंमत जाणून घेऊयात...

Moto G86 Power 5G: दमदार बॅटरी व कॅमेऱ्यासह भारतात लाँच झाला हा फोन, जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स
Moto G86Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 01, 2025 | 1:54 PM
Share

मोटोरोलाने 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन 5जी स्मार्टफोन Moto G86 Power 5G लाँच केला आहे. या फोनच्या काही खास फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटमध्ये पॉवरफुल 6720mAh बॅटरी, मीडियाटेक प्रोसेसर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, हाय-रेझ ऑडिओ सर्टिफिकेशन, एचडीआर10 प्लस सारख्या फिचर्सचा समावेश आहे. या फोनची विक्री कोणत्या दिवसापासून सुरू होईल, या फोनसाठी कोणत्या किंमतीत खरेदी करू शकता आणि या फोनमध्ये कोणते खास फिचर्स उपलब्ध असतील? चला जाणून घेऊयात.

Moto G86 Power 5G ची भारतातील किंमत

या नवीनतम मोटोरोला स्मार्टफोनच्या 8 जीबी / 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे तर 8 जीबी / 256 जीबीच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. अशातच या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 6 ऑगस्टपासून कंपनीच्या साइटव्यतिरिक्त फ्लिपकार्टवर सुरू होईल.

स्पर्धा

मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन या किंमत लाँच होताच, हा Nothing Phone 2 Pro किंमत 18,999 रुपये, तर Oppo Reno 12 5G किंमत 19,999 रुपये, Realme P3 5G किंमत 18,499 रुपये आणि Poco X7 5G किंमत 18,999 रुपये या स्मार्टफोनशी स्पर्धा होणार आहे.

Moto G86 Power 5G Specifications

डिस्प्ले : या मोटोरोला मोबाईलमध्ये 6.8-इंचाचा सुपर एचडी रिझोल्यूशन एमोलेड स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट120 हर्ट्झ आहे जो 4500 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास 7आय वापरण्यात आला आहे.

चिपसेट : चांगल्या कामगिरीसाठी, Moto G86 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे.

रॅम आणि स्टोरेज : फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे, परंतु मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने तुम्ही स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी 600 प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, तसेच मॅक्रो मोडसह 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आहे. त्याच वेळी, फोनच्या पुढील बाजूस सेल्फीसाठी 32

-मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल.

बॅटरी : फोनला पॉवर देण्यासाठी एक पॉवरफुल 6720mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W टर्बोपॉवर सपोर्टसह येते.

कनेक्टिव्हिटी : हा फोन ड्युअल नॅनो सिमसह येतो आणि त्यात ब्लूटूथ व्हर्जन 5.4, 5जी, वाय-फाय 6, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि जीपीएस सारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेसाठी या नवीनतम मोटोरोला फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.