AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता WhatsApp Status वरही लावता येणार म्युझिक! जाणून घ्या कसे वापराल हे फीचर

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर फोटोसोबत गाणं लावण्यासाठी आता कुठलाही 'जुगाड' किंवा वेगळ्या ॲपची गरज नाही! आता WhatsApp नेच हे भन्नाट फीचर थेट ॲपमध्ये आणलं आहे. हे वापरण्यास एकदम सोपं आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुमचे फोटो स्टेटस अजून आकर्षक आणि इंटरेस्टिंग बनवा!

आता WhatsApp Status वरही लावता येणार म्युझिक! जाणून घ्या कसे वापराल हे फीचर
व्हॉट्सअप स्टेटसवर लावा की गाणंImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Apr 17, 2025 | 2:50 PM
Share

सध्या सोशल मीडियावर कोणाचं स्टेटस किती “कूल” दिसतं, यालाही तितकंच महत्त्व आलं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती अ‍ॅप्स म्हणजे WhatsApp आणि Instagram. जसं Instagram वर स्टोरीजमध्ये गाणी लावण्याचा पर्याय आहे, तसंच काहीतरी WhatsApp स्टेटससाठी हवं, अशी अनेकांची मागणी होती. पण WhatsApp स्टेटसवर गाणं लावण्यासाठी यापूर्वी वेगवेगळी अ‍ॅप्स वापरावी लागत होती, स्क्रीन रेकॉर्डिंग, व्हिडिओ एडिटिंग करावं लागत होतं म्हणजे थोडक्यात जुगाड करावा लागायचा.

पण आता ही सगळी झंझट संपली! कारण Meta ने अखेर युसर्सची मागणी पुर्णकरण्यााठी एक नवं म्युझिक फीचर आणलं आहे. आता WhatsApp स्टेटसवरही तुम्ही फोटोसोबत तुमचं आवडतं गाणं सहज लावता येणार आहे. हे फीचर Android युजर्ससोबतच आता iPhone युजर्ससाठीही उपल्बद्ध आहे.

हे नवं म्युझिक फीचर कसं वापरायचं? फॉलो करा या ६ सोप्या स्टेप्स 

स्टेप १: WhatsApp अपडेट करा

तुमच्या फोनमध्ये WhatsApp चं नवीन व्हर्जन आहे का ते Play Store किंवा App Store वर जाऊन तपासा. नसेल तर लगेच अपडेट करा.

स्टेप २: ‘Updates’ टॅबवर जा

WhatsApp उघडल्यावर खाली ‘Updates’ टॅब दिसेल (पूर्वीचा ‘Status’). त्यावर क्लिक करा.

स्टेप ३: फोटो निवडा

तुमच्या गॅलरीतून हव्या त्या फोटोचा निवड करा, जसा तुम्ही स्टेटसला लावत होता.

स्टेप ४: ‘Music’ आयकॉन टॅप करा

फोटो एडिट करताना वरती नवीन ‘Music’ चं चिन्ह दिसेल. त्यावर टॅप करा.

स्टेप ५: गाणं निवडा

तुमच्या आवडीनुसार गाणं निवडा. त्याचा योग्य भाग कापून स्टेटससाठी निवडू शकता.

स्टेप ६: स्टेटस पोस्ट करा

गाणं आणि फोटो एकत्र कसं दिसेल याचा प्रिव्ह्यू बघा आणि मग स्टेटस शेअर करा!

ही फीचर सुद्धा WhatsApp चॅटप्रमाणेच पूर्णपणे सुरक्षित (End-to-End Encrypted) आहे. त्यामुळे तुमचं स्टेटस फक्त ज्यांना दाखवायचं आहे त्यांनाच दिसेल. लवकरच iPhone यूजर्ससाठीही हे फीचर येणार आहे – तोपर्यंत अँड्रॉइड युजर्स मजा घेऊ शकतात!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.