AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 जीबी पर्यंत रॅम आणि 10 हजार mAh बॅटरीसह लाँच झालेला हा पॉवरफुल फीचर फोन

Honor कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून, यामध्ये पॉवरफुल 10,000mAh बॅटरी, MediaTek Dimensity 8500 प्रोसेसर सह अनेक जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग आजच्‍या लेखात आपण या फोन‍चे फिचर्स जाणून घेऊयात.

16 जीबी पर्यंत रॅम आणि 10 हजार mAh बॅटरीसह लाँच झालेला हा पॉवरफुल फीचर फोन
| Edited By: | Updated on: May 30, 2026 | 5:18 PM
Share

जागतिक बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. त्यातच ऑनर विन टर्बो हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आलेला आहे. तर हा नवीन फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पॉवरफुल 10,000mAh बॅटरी, 8,000 निट्सची कमाल ब्राइटनेस, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज यांचा समावेश आहे. या डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

ऑनर विन टर्बो माहिती

हा नवीनतम ड्युअल-सिम स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो.

यात 6.79-इंचाचा 1.5K AMOLED ओएसिस आय प्रोटेक्शन डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, 3840Hz PWM डिमिंग आणि 8000 nits पर्यंतची पीक ब्राइटनेस आहे.

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 रेसिंग एडिशन प्रोसेसर आणि उत्कृष्ट ग्राफिक्ससाठी माली-जी720 एमसी8 जीपीयू वापरण्यात आला आहे.

या फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज देखील आहे. लिफ्ट, भूमिगत कार पार्क आणि हाय-स्पीड रेल्वे स्टेशन यांसारख्या कमकुवत नेटवर्क असलेल्या ठिकाणी स्थिर कम्युनिकेशनसाठी कंपनीने C1+ RF एन्हांसमेंट चिपचाही वापर केला आहे.

आता या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर समाविष्ट आहे. 5-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा सेन्सरदेखील उपलब्ध आहे. सेल्फीसाठी या हँडसेटमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. फोन थंड ठेवण्यासाठी थर्मल मॅनेजमेंटमध्ये 40,000 चौरस मिमी लिक्विड कूलिंग एरियाचाही समावेश आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ब्लूटूथ 6.0, 5G, NFC, GPS, OTG आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे.

सेन्सर्समध्ये जायरोस्कोप, अ‍ॅक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी आणि ग्रॅव्हिटी सेन्सर्सचा समावेश आहे. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

नवीन फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स आणि ड्युअल मायक्रोफोन्स आहेत. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग मिळाले आहे. तसेच याला SGS गोल्ड स्टँडर्ड फाईव्ह-स्टार ड्रॉप, शॉक आणि क्रश रेझिस्टन्स सर्टिफिकेशन्स देखील मिळाली आहेत.

फोनमध्ये 10,000mAh क्षमतेची पॉवरफूल बॅटरी आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. एकदा चार्ज केल्यावर ही बॅटरी 17.3 तासांपर्यंत सतत नॅव्हिगेशनचा वेळ आणि 14.2 तासांपर्यंत गेमिंगचा वेळ देते असा दावा केला जातो.

ऑनर विन टर्बो किंमत

हँडसेटच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3299 चीनी युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 46,000 रूपये इतकी आहे, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3599 चीनी युआन अंदाजे 50 हजार रूपये आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4199 चीनी युआन अंदाजे 60 हजार रूपये आहे. हा फोन तुम्हाला निळ्या, काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये मिळेल. सध्या हा फोन चीनमध्ये लाँच झाला असुन हा फोन भारतात लाँच होईल की नाही हे अद्याप कळलेले नाही.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री.

एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?.

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या