VIDEO : सोशल मीडियात पुन्हा ‘कच्चा बदाम’चा फिवर; ‘या’ मुलीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल बेभान
कच्चा बदाम हे गाणं सोशल मीडियावर चांगले झाले होते. या गाण्यावर बऱ्याच जणांनी रिल्स बनवल्या. गाणे इतके धमाल होते की, प्रत्येकाला सोशल मीडियावर भन्नाट प्रतिसाद मिळाला.

सोशल मीडियामध्ये रोज नवनवे व्हिडिओज भेटीला येतात. त्यातले काही नेमके व्हिडिओ तर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्या व्हिडिओंचे महत्व एका दिवसात संपत नाही. त्यातील कंटेंट इतका धमाकेदार असतो की लोक या व्हिडिओच्या प्रेमात पडतात. मग हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे एका लहान मुलीचा. ज्या मुलीने ‘कच्चा बदाम‘ या अलीकडेच गाजलेल्या गाण्यावर ठेका धरला आहे. तिचा डान्स पाहून जो तो बेभान होऊन ताल धरत आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये पुन्हा ‘कच्चा बदाम’चा फिवर दिसत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ठेका धरला नाही तर नवल.
युजर्स म्हणतायेत ‘क्यूट व्हिडिओ’
कच्चा बदाम हे गाणं सोशल मीडियावर चांगले झाले होते. या गाण्यावर बऱ्याच जणांनी रिल्स बनवल्या. गाणे इतके धमाल होते की, प्रत्येकाला सोशल मीडियावर भन्नाट प्रतिसाद मिळाला. अनेक तरुण-तरुणींनी हे गाणं आपल्या परीने सादर केले.
आबाल वृद्धांनी या गाण्याला डोक्यावर घेतले. सध्या याच गाण्याच्या तालावर एक क्युट मुलगी डान्स करते आहे. साधारण तीन-चार वर्षांची ही चिमुकली गाण्यावर अप्रतिम ठेका धरत सर्वांनाच मंत्रमुग्ध करत आहे. तिचा व्हिडिओ पाहताना लोक क्षणाक्षणाला वाह वाह अशी दाद देत आहेत.
व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस
हा व्हिडिओ एका घरामध्ये चित्रित करण्यात आला आहे. तिथल्या उपस्थित लोकांनी चिमुकलीच्या डान्सला दाद दिली असेलच. त्यापेक्षा कैक पटीने सोशल मीडियावरील तिचा व्हिडिओ कौतुकास्पद ठरला आहे. व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
चार महिन्यांपासून गाणे लोकप्रिय
कच्चा बदाम गाण्याची मागील चार महिन्यांपासून लोकांच्या मनावर जादू आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये हे गाणं वाजताच लोकांचे व्हिडिओकडे लक्ष आवर्जून जाते. सध्या एका चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ अशाच प्रकारे लक्ष वेधून घेत आहे.
एका युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलगी एवढा क्युट डान्स करते आहे की, व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट केल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही.
