VIDEO : हत्तीच्या! या 45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहा हत्तीची चिखलामध्ये धिंगामस्ती!

हत्ती पृथ्वीवरील सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियात हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय ठरत आहेत. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात.

VIDEO : हत्तीच्या! या 45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहा हत्तीची चिखलामध्ये धिंगामस्ती!
हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : हत्ती पृथ्वीवरील सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियात हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय ठरत आहेत. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. (The 45-second video of the elephant went viral on social media)

त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या अजबगजब व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही धम्माल चर्चा सुरू असते. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यात हत्ती एका पॅडलिंग पूलमध्ये खेळताना दिसतो. 45 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुंदानी नावाचा नऊ वर्षांचा हत्ती पॅडलिंग पूलमध्ये मजा आणि मस्ती करताना दिसतो आहे.

व्हिडिओमध्ये, हत्ती सुमारे 10 सेकंद विश्रांती घेतो आणि लगेच गढूळ पाण्यात खेळू लागतो. यावेळी येथे बरेच हत्ती दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर शेल्ड्रिक वाइल्डलाइफने अपलोड केला आहे, हा ट्रस्ट अनाथ हत्तींच्या बचाव आणि पुनर्वसनासाठी काम करतो. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, तुंदानी हा बचावलेल्या हत्तींपैकी एक आहे आणि 2013 मध्ये सापडला होता.

या अपलोड केलेला व्हिडिओला सोशल मीडियावर 8,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजर्सने लिहिले आहे की, ‘हा हत्ती खूप गोंडस आहे’ दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, सर्व हत्ती किती प्रेमाने खेळत आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO | ट्विटरवर का ट्रेंड होतोय #Dosa? व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की पाहा

खतरनाक! मुलीचा अफलातून स्टंट, नेटीझन्स विचारतायत अंगात हाडं आहेत की नाही?

केरळचा ऑटो ड्रायव्हर सोशल मीडियावर रातोरात फेमस, असे नेमके काय झाले पाहा तुम्हीच!

(The 45-second video of the elephant went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI