पोस्ट ऑफिस बँक खात्याशी तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करावा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) खात्याशी तुमचा मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप ते अपडेट केले नसेल तर ते त्वरित करा जेणेकरून आपल्याला आपल्या खात्याशी संबंधित अपडेट्स मिळत राहतील.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अकाऊंट ( IPPB ) म्हणजेच पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या खात्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करणं आता गरजेचं आहे. कारण जर तुमचा नंबर तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर कोणत्याही कारणास्तव तुमचा मोबाईल नंबर तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खात्याशी लिंक नसेल तर ताबडतोब लिंक करून घ्या. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेशी तुमचा मोबाइल क्रमांक जोडणे सोपे आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील हे करू शकता.
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे त्यांच्या खात्यावर लक्ष ठेवणे आता सोपे झाले आहे. आता ग्राहक त्यांच्या खात्यातील आर्थिक व्यवहारांचा सहज मागोवा घेऊ शकतात. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेशी लिंक केला तर तुम्हाला एसएमएस अलर्ट, ओटीपी व्हेरिफिकेशन आणि ऑनलाइन बँकिंग सुविधांसारख्या सेवा मिळतील. अपडेटनंतर खातेदारांना बचत, आरडी आदी व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. त्यामुळे खात्याच्या सुरक्षिततेसाठी तुमचा नवीन मोबाईल नंबर खात्यासोबत अपडेट करणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात.
पोस्ट ऑफिसच्या खात्याशी तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करावा?
पोस्ट ऑफिस अकाऊंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन पद्धतीने बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
लॉग इन करा: अधिकृत पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग पोर्टलला भेट द्या आणि तुमचे क्रेडेन्शियल्स (नाव आणि पासवर्ड) वापरून लॉग इन करा.
प्रोफाईल सेटिंग्जमध्ये जा: लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डमधील ‘प्रोफाईल’ किंवा ‘अकाउंट सेटिंग्ज’ सेक्शनमध्ये जा.
मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय निवडा: प्रोफाईल सेटिंगमेनूमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट किंवा बदलण्याचा पर्याय शोधा.
नवीन मोबाईल नंबर टाका: तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्याशी लिंक करू इच्छित असलेला नवीन मोबाईल नंबर लिहा.
मोबाईल नंबरची पडताळणी करा : पुढे जाण्यापूर्वी कन्फर्म करण्यासाठी नवीन मोबाईल नंबर पुन्हा एकदा चेक करा.
ओटीपी: तुम्हाला नवीन मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड प्राप्त करण्यासाठी ‘रिक्वेस्ट ओटीपी’ बटणावर क्लिक करा.
ओटीपी प्रविष्ट करा: ओटीपीसाठी तुमचा SMS इनबॉक्स तपासा आणि पोर्टलवर आलेला ओटीपी योग्य नंबर लिहा.
रिक्वेस्ट सबमिट करा: ओटीपी कन्फर्म केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
कंफर्मेशन मेसेज मिळेल : अपडेट स्वीकारणारा व तुमच्या जुन्या आणि नवीन दोन्ही मोबाईल नंबरवर एक कंफर्मेशन मेसेज किंवा ईमेल पाठविला जाईल.
लॉग आऊट करा: प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या इंटरनेट बँकिंग खात्यातून लॉग आऊट करा.
ॲक्टिव्हेशनसाठी थांबा: नवीन मोबाईल नंबर सामान्यत: काही तास किंवा 24 तासांच्या आत सक्रिय होईल.
अपडेटसाठी तपासा: एकदा नवीन नंबर अपडेट झाल्यानंतर तुम्ही व्यवहारांसाठी ओटीपी प्राप्त करण्याचा प्रयत्न करून किंवा लॉगिन करण्याचा प्रयत्न करून तपासू शकता.
कस्टमर केअरशी संपर्क साधा: जर तुम्हाला अपडेटसह काही समस्या येत असतील तर तुम्ही मदतीसाठी पोस्ट कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता.