AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेटीएम सुरु करणार फास्टॅग आधारित पार्किंग सेवा, डीएमआरसीसोबत केली सुरुवात

पेटीएमने काश्मिरी गेट मेट्रो स्टेशनवर फास्टॅग आधारित पार्किंग सुविधा सुरू केली आहे. PPBL वैध FASTag स्टिकर्स असलेल्या कारसाठी सर्व FASTag- आधारित व्यवहारांची प्रक्रिया सुलभ करेल. यासह, काउंटरवर रोख पेमेंटसाठी थांबण्याची आवश्यकता राहणार नाही.

पेटीएम सुरु करणार फास्टॅग आधारित पार्किंग सेवा, डीएमआरसीसोबत केली सुरुवात
पेटीएम सुरु करणार फास्टॅग आधारित पार्किंग सेवा
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 5:11 PM
Share

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा फर्म पेटीएम(Paytm) देशभरात FASTag आधारित पार्किंग सेवा सुरू करेल. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (Paytm Payments Bank Ltd- PPBL)ने सोमवारी सांगितले की त्यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या भागीदारीत देशातील पहिली फास्टॅग आधारित मेट्रो पार्किंग सुविधा सुरू केली आहे. पेटीएमने काश्मिरी गेट मेट्रो स्टेशनवर फास्टॅग आधारित पार्किंग सुविधा सुरू केली आहे. PPBL वैध FASTag स्टिकर्स असलेल्या कारसाठी सर्व FASTag- आधारित व्यवहारांची प्रक्रिया सुलभ करेल. यासह, काउंटरवर रोख पेमेंटसाठी थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. याव्यतिरिक्त, पेटीएम पेमेंट्स बँकेने पार्किंगच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या दुचाकींसाठी UPI आधारित पेमेंट सोल्यूशन आणले आहे. (Paytm will launch fastag based parking service, starting with DMRC)

पेटीएम पेमेंट्स बँक 1 कोटी फास्टॅग जारी करणारी पहिली बँक

– जूनमध्ये 1 कोटी फास्टॅग जारी करण्याचा आकडा गाठणारी पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) देशातील पहिली बँक ठरली. NPCI च्या मते, जून 2021 च्या अखेरीपर्यंत सर्व बँकांनी एकूण 3.47 कोटींहून अधिक फास्टटॅग जारी केले होते.

– डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह यांनी पीपीबीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डीएमआरसी आमच्या ग्राहकांना समाधान प्रदान करण्याच्या डिजिटलायझेशनच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा संपर्कविरहित व्यवहार पद्धती ही काळाची गरज आहे.

– शॉपिंग मॉल, रुग्णालये आणि विमानतळांवर पार्किंग क्षेत्रांसाठी डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स लागू करण्यासाठी बँक विविध भागधारकांशी चर्चा करत आहे.

– पीपीबीएल देशभरात पार्किंग सुविधा डिजिटल करेल, काश्मिरी गेट मेट्रो स्टेशन हे बँकेच्या डिजिटल पेमेंट सोल्यूशनद्वारे समर्थित होणारे पहिले स्टेशन आहे, असे निवेदनात म्हटले आहे. संघटित आणि असंघटित अशा फास्टॅगवर आधारित पार्किंग सुविधा सुरू करण्यासाठी बँक अनेक राज्यांतील विविध महानगरपालिकांशी जवळून काम करत आहे.

फास्टॅग नेटवर्क वाढवले

पीपीबीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गुप्ता म्हणाले, आम्ही आमच्या देशात फास्टॅग नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत त्यांच्या पार्किंग सुविधेमध्ये डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स सक्षम करण्यासाठी आम्ही भागीदार आहोत. फास्टॅग प्रणाली लागू करून सुरक्षित आणि संपर्कविरहित पेमेंट सोल्यूशन स्वीकारण्यासाठी आम्ही देशभरातील इतर पार्किंग प्रदात्यांसोबत काम करणे सुरू ठेवू. (Paytm will launch fastag based parking service, starting with DMRC)

इतर बातम्या

सांगलीच्या महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतल्या कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक, पोलीस आरोपींच्या मुसक्या कशा आवळणार?

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.