100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 12 October 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 12 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 9:34 AM

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यामागे पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसात याबाबत तक्रार केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजे देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली आहे. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिले आहेत.

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यामागे पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसात याबाबत तक्रार केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजे देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली आहे. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्यावर कोण आणि कशासाठी पाळत ठेवत आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी एनसीबीने ज्या दिवशी क्रूझ पार्टीवर कारवाई केली त्यादिवशी काही भाजप नेतेही त्यांच्यासोबत होते, असा दावा मलिक यांनी केला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ देखील दाखवत त्याचे पुरावे दिले होते. त्यामुळेच वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी स्वत: समीर वानखेडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.