100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 12 November 2021

| Updated on: Nov 12, 2021 | 11:21 AM

कारवाईनंतर निलंबीत कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिलाय. निलंबीत केलेले कर्मचाऱ्यांनी टिव्ही-9 वर आपली व्यथा मांडलीये. कारवाई केली तरी एसटीच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारच या भुमिकेवर निलंबीत एसटी कर्मचारी ठाम आहेत.

Follow us on

रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. कारण, गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणे 28 एसटी कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 28 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली असताना एसटी बस चालू ठेवणाऱ्या चालक वाहकांचा सत्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आलीये.

या कारवाईनंतर निलंबीत कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिलाय. निलंबीत केलेले कर्मचाऱ्यांनी टिव्ही-9 वर आपली व्यथा मांडलीये. कारवाई केली तरी एसटीच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारच या भुमिकेवर निलंबीत एसटी कर्मचारी ठाम आहेत.