Special Report | असा झाला 26 नक्षलींचा खात्मा?

| Updated on: Nov 14, 2021 | 10:06 PM

प्रचंड गोळीबार होऊन सुद्धा पोलीस आणि जवान लढले. आमच्याकडून मिळालेलं प्रत्युत्तर पाहून बाकीचे नक्षल पळून गेले आहेत. त्यांचा शोध घेत आहोत, असं अंकित गोयल यांनी सांगितलं. सकाळी 6 वाजता ही चकमक सुरू झाली. तब्बल 9 तासही चकमक सुरू होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow us on

YouTube video player

गडचिरोली: गडचिरोलीत किमान 100 नक्षलवाद्यांशी आमची चकमक उडाली होती. त्यात छत्तीसगडचेही काही नक्षलवादी होते. आम्ही जोरदार हल्ला केल्याने 26 नक्षलवादी मारले गेले. तर बाकीचे नक्षलवादी पळून गेले असं गडचिरोलीच्या पोलिसांनी सांगितलं. गडचिरोलीत काल पोलसी आणि नक्षलवाद्यांची मोठी चकमक उडाली. त्यात 26 नक्षलवादी मारले गेले. या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यानी पत्रकार परिषद घेतली. डीआयजीच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडलं. अॅडिशनल एसपी समीर, अॅडिशनल एसपी अनूज तारी यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच सोमय मुंडे हे ग्राऊंडवर लीड करत होते. प्रचंड गोळीबार होऊन सुद्धा पोलीस आणि जवान लढले. आमच्याकडून मिळालेलं प्रत्युत्तर पाहून बाकीचे नक्षल पळून गेले आहेत. त्यांचा शोध घेत आहोत, असं अंकित गोयल यांनी सांगितलं. सकाळी 6 वाजता ही चकमक सुरू झाली. तब्बल 9 तासही चकमक सुरू होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.