Nagpur | रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा, राज्यातील पहिलं प्रकरण

Nagpur | रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा, राज्यातील पहिलं प्रकरण

| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 6:37 PM

महेंद्र रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता, 17 एप्रिल 2021 रोजी हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदविला होता. उच्च न्यायालयाने अशा प्रकरणाला गांभीर्याने घेऊन फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालविण्याचे आदेश दिले होते.

नागपूर : रेमडीसीविर काळाबाजार प्रकरणी पहिली शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाने 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. महेंद्र रंगारी असे आरोपीचे नाव असून या प्रकारच्या प्रकरणातील राज्यातील ही पहिलीच घटना आहे. महेंद्र रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता, 17 एप्रिल 2021 रोजी हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदविला होता. उच्च न्यायालयाने अशा प्रकरणाला गांभीर्याने घेऊन फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालविण्याचे आदेश दिले होते.