36 जिल्हे 50 बातम्या | 8.30 AM | 02 October 2021
“ओल्या दुष्काळामुळे विदर्भ - मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे” असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.
“ओल्या दुष्काळामुळे विदर्भ – मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे” असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. आजपासून देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर ओल्या दुष्काळाचा पाहणी दौरा करत आहेत. नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, असं देवेंद्र फडणवीस ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले.
