4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 October 2021

| Updated on: Oct 26, 2021 | 8:16 AM

समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असंही वळसे-पाटील म्हणाले. तर प्रभाकर साईलचं प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी माहिती वळसे-पाटलांनी दिली.

Follow us on

मुंबई ड्रग्स प्रकरणाला रोज नवं वळण मिळत आहे. आता प्रभाकर साईल यांच्या एका व्हिडीओमुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिक आक्रमक झाले आहेत. तर साईल यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबई पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.