4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 29 July 2021

| Updated on: Jul 29, 2021 | 8:28 AM

सुप्रीम कोर्टानं राजस्थान सरकारला दिलेल्या निकषा प्रमाणं महाराष्ट्रातही खासगी शाळांची फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी शाळांची फी 85 टक्के भरावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

Follow us on

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. सुप्रीम कोर्टानं राजस्थान सरकारला दिलेल्या निकषा प्रमाणं महाराष्ट्रातही खासगी शाळांची फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी शाळांची फी 85 टक्के भरावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. पालकांना मोठ्या प्रमाणात आशा होती, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल, असं त्या म्हणाल्या.

सर्वसाधारपणे शाळांनी फी वाढवू नये असं सांगण्यात आलं होतं. गेल्यावर्षीही शाळांना फी वाढवून नये असं सागंण्यात आलं होतं. आपण यावर्षी जी फी ठरलेली आहे त्यातील 15 टक्के फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं आदेश दिला होता त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.