4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 23 September 2021

| Updated on: Sep 23, 2021 | 3:52 PM

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपकडूनही संजय उपाध्याय यांचं नामांकन दाखल करण्यात आलं आहे.

Follow us on

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपकडूनही संजय उपाध्याय यांचं नामांकन दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय.