Pune Bull Race | पुण्यात उद्या पहिली बैलगाडा शर्यत, आतापर्यंत 703 मालकांकडून नाव नोंदणी

| Updated on: Dec 31, 2021 | 10:45 AM

शर्यतीच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत 703 बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने नाव नोंदणी होत असल्याने लकी ड्रॉ पद्धतीने हे टोकन काढण्यात येत आहे.

Follow us on

बैलगाड्याच्या शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने नियम व अटी घालून सशर्त परवानगी दिल्याने बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत आंबेगाव तालुक्यामधील लांडेवाडी येथे उद्या (1जानेवारी) रोजी होणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे शर्यत भरवण्यात येणार आहे. लसीचे दोन डोसपूर्ण झालेलया लोकांनाच शर्यतीच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.भिर्रर्र ला… च्या आयोजनासाठी गाडा मालक आता जिल्हाधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करत आहेत. शर्यतीच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत 703 बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने नाव नोंदणी होत असल्याने लकी ड्रॉ पद्धतीने हे टोकन काढण्यात येत आहे.