Beed : ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

Beed : ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

| Updated on: Jul 10, 2025 | 9:32 AM

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढण्याच्या वादावर पुन्हा एकदा चर्चा झाली.

बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी काढण्याविषयीचा प्रश्न समोर आला आहे. यावर आमदार उमा खापरे यांनी जिल्ह्यातील 843 महिलांच्या गर्भपिशवी काढल्याचं आपल्या निवेदनात म्हंटलं आहे. तर या महिला स्वेच्छेने शस्त्रक्रिया करतात की त्यांना कोणी बळजबरी करतं असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा खापरे यांनी उचलून धरला. जिल्ह्यातल्या 843 ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढली आहे. जी महिला 400 रुपये 16 तास काम करून मिळवते, तीच महिला 35 ते 40 हजार रुपये खर्च करून खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया कशी करू शकते? जिल्ह्यात अद्ययावत सरकारी रुग्णालय असूनही अशाप्रकारे या महिलांनी खासगी रुग्णालयात गर्भपिशवी का काढली? असा प्रश्न आमदार खापरे यांनी उपस्थित केला. त्यानंतर मनीषा कायंदे यांनी देखील यावर भाष्य करत हा या महिला स्वेच्छेने शस्त्रक्रिया करतात की त्यांना कोणी बळजबरी करतं हा प्रश्न किचकट असल्याचं म्हंटलं आहे.

Published on: Jul 10, 2025 09:32 AM