अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

| Updated on: Apr 02, 2025 | 3:44 PM

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. मनसेने हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं म्हंटलं आहे.

‘अबीर गुलाल’ हा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर चित्रपट 9 मे रोजी भारतात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराची भूमिका असल्याने या चित्रपटाला मनसेकडून विरोध करण्यात आला आहे.

याबद्दल मनसे चित्रपट सेनेचे कर्मचारी अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपली भूमिका टीव्ही9 मराठीशी बोलताना स्पष्ट केली आहे. यावेळी खोपकरम्हणाले की, पाकिस्तानी चित्रपट आणि पाकिस्तानी कलाकारांना आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा विचार बदलावा. आम्ही याठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकाराला घेऊन चित्रपट बनवण्याची आपल्याला गरज काय आहे?

 

Published on: Apr 02, 2025 03:44 PM