कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?
अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती
अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर अभिजीत यांनी काही दिवसांपूर्वीही त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
आता अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि लोकांना आवाहन केले आहे की, ‘मला एअरपोर्टवर भेटा. ज्यांना कोणाला या प्रकरणामुळे त्रास झाला ते विद्यार्थी, पालक तसेच या सरकारबाबत ज्यांना असंतोष आहे त्यांनी यावं. आपण सर्व कॉकरोच पार्टीचे समर्थक मिळून जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करू.’ हे आंदोलन शांततापूर्ण असेल, असंही त्याने सांगितलं आहे. अभिजीत दीपके हा नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीला येणार आहे. देशासाठी काहीतरी करण्याची ही वेळ असल्याचं त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
