इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता…

इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता…

| Updated on: Oct 10, 2026 | 4:28 PM

अभिजीत दिपके यांच्या आजीचे वयाच्या ८५-९० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संतुक पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे. दिल्लीत अटकेत असल्याने अभिजीत दिपके आजीच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहू शकणार नाहीत, यामुळे कुटुंबीयांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. उद्या सकाळी संतुक पिंपरी येथे अंत्यसंस्कार होतील.

CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीचे नुकतेच निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे संतुक पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अंदाजे ८५ ते ९० व्या वर्षी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून मधुमेहाचा त्रास होता आणि पायही सुजला होता. या दुःखाच्या प्रसंगी अभिजीत दिपके दिल्लीत अटकेत असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीविनाच आजीचे अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. अभिजीतचे काका विलास दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीतची अनुपस्थिती कुटुंबाला अधिक सतावत आहे. “माझा अभिजीत आज असता तर खूप चांगलं वाटलं असतं,” असे विलास दिपके यांनी म्हटले.

अभिजीत शेवटचे २५ दिवसांपूर्वी एका आंदोलनाच्या वेळी आजीला भेटले होते. आजीचे अंत्यसंस्कार संतुक पिंपरी गावातील स्मशानभूमीत उद्या सकाळी १०.०० ते १०.३० च्या दरम्यान होणार आहेत. कुटुंबातील काही सदस्य आणि नातवाची पत्नी यांच्या येण्याची प्रतीक्षा केली जात आहे. दिपके कुटुंब सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे – आजीच्या निधनाचे दुःख आणि अभिजीत दिपके यांच्या अटकेची चिंता.

Published on: Oct 10, 2026 4:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us