Pankaja Munde | अंबाजोगाई प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी : पंकजा मुंडे

Pankaja Munde | अंबाजोगाई प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी : पंकजा मुंडे

| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 4:09 PM

नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यांत 400 हून अधिक जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीडमधील आंबेजोगाईमध्ये घडली आहे. या घटनेनंतर पीडिता दोन महिन्यांची गरोदर आहे.

नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन विवाहितेवर सहा महिन्यांत 400 हून अधिक जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीडमधील आंबेजोगाईमध्ये घडली आहे. या घटनेनंतर पीडिता दोन महिन्यांची गरोदर आहे. याप्रकरणी बाल कल्याण समिती पीडितेचा गर्भपात करण्याची प्रक्रिया करीत आहे. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरुन नऊ जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या पित्यासह चार आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. यापक्ररणाचा सखोल तपास पोलीस करीत असून अंबाजोगाई शहरातील सर्व लॉजिंगची तपासणी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सांगितले, दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडली आहे.