Dombivali | Ekta Sawant | परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई… डोंबिवलीत मनसे आक्रमक

Dombivali | Ekta Sawant | परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई… डोंबिवलीत मनसे आक्रमक

| Updated on: Jan 24, 2026 | 4:42 PM

डोंबिवलीमध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे कारण डोंबिवलीमधील एकता सावंत ह्या तरुणीचा शोर्माचा व्यवसाय पालिकेने बंद पाडला होता. ज्या ठिकाणी तरुणी व्यवसाय करत होती तिथे आजूबाजूच्या परिसरात परप्रांतीय देखील व्यवसाय करतात, मात्र पालिकेने फक्त ह्या तरुणीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले.

डोंबिवलीमध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे कारण डोंबिवलीमधील एकता सावंत ह्या तरुणीचा शोर्माचा व्यवसाय पालिकेने बंद पाडला होता. ज्या ठिकाणी तरुणी व्यवसाय करत होती तिथे आजूबाजूच्या परिसरात परप्रांतीय देखील व्यवसाय करतात, मात्र पालिकेने फक्त ह्या तरुणीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. परप्रांतीय येऊन जर इकडे येऊन व्यवसाय करतात तर आम्हाला का रोखलं जात? असा सवाल करत एकता सावंत हिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. माझ्यावर अन्याय होतोय असं सांगणारा तो व्हिडिओ थेट मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचला आणि लगेचच मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगून घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तरुणीची भेट घेत तिला नवीन स्टॉल टाकून देण्याचे आश्वासन दिले आहे. घडलेल्या सर्व घटनेची चौकशी करून तरुणील परत तिचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत करणार असे आश्वासन मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर मराठी माणसाला व्यवसाय करू द्या अशी मागणी ह्या तरुणीने केली आहे. मात्र पालिका यावर काय भूमिका घेते हे थोड्याच दिवसात पाहायला मिळणार आहे.

Published on: Jan 24, 2026 04:28 PM