शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाला मोठा झटका

| Updated on: Mar 13, 2023 | 3:49 PM

VIDEO | शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ मॉर्फिंग प्रकरणी युवासेना कार्यकारिणी सदस्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी व्हायरल व्हिडीओ संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी 1 अंधेरीतील पदाधिकारी तर दुसरा दहीसरमधील कार्यकर्ता असल्याची माहिती दिली. दरम्यान, या मॉर्फिंग व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाला मोठा झटका मिळाल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय आणि ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गेला दहिसर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. साईनाथ दुर्गे हा युवासेना कार्यकारिणी सदस्य असून मुंबई विमानतळावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.