Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे…भ्रष्ट अन् स्वतःचे खिसे भरले, मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही, आदित्य ठाकरेंची जिव्हारी लागणारी टीका काय?
वाकोला पुलावरील खड्ड्यांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना फोन केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंंवर निशाणा साधत एक ट्वीट केलंय.
फेकनाथ मिंधे यांच्या भ्रष्ट कारभाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सोडलं नाही, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक भाष्य करत निशाणा साधला आहे. वाकोला पुलावरील खड्ड्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना फोन केला, यावरूनच आदित्य ठाकरे यांनी ही घणाघाती टीका केली.
ट्वीटमध्ये ठाकरेंनी असं म्हटलं की, या भ्रष्ट कारभाराला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा गेली दोन वर्ष होता. मिंधेना वॉशिंग मशीनमध्ये त्यांनीच धुतलं आणि आता मिंधेंनी मुंबईची तिजोरी धुतली! पुढे असंही म्हटलं की, वाकोला पुलावरील खड्डे, या बाबत आमचे आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी विडियो सोशल मिडियावर शेअर केला होता. २ वर्ष मी सातत्याने सांगतोय की ५ कंत्राटदारांना हाताशी घेऊन मिंधेनी स्वतःचे खिसे भरले, पण अजून खड्डे करुन ठेवले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना फोन केल्याची माहिती मिळतेय.
🚨 फेकनाथ मिंधे ह्यांच्या भ्रष्ट कारभाराने आज मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही! 🚨
वाकोला पुलावरील खड्डे, ह्या बाबत आमचे आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी विडियो सोशल मिडियावर शेअर केला होता.
२ वर्ष मी सातत्याने सांगतोय की ५ कंत्राटदारांना हाताशी घेऊन मिंधेनी स्वतःचे खिसे भरले, पण अजून…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 22, 2025
