Aaditya Thackeray | राज्यातील फक्त एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Aaditya Thackeray | राज्यातील फक्त एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Feb 22, 2026 | 4:24 PM

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली, जिथे विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही मला एक तरी असा जिल्हा दाखवा, जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली, जिथे विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही मला एक तरी असा जिल्हा दाखवा, जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे. “पण आज शेतकरी आत्महत्यांचा विषय आहे, बेरोजगारी वाढली आहे आणि गुंतवणूक कमी आहे. विधानसभेत फक्त खोटी आश्वासनं दिली जातात.” तसेच, मुलुंडमध्ये मेट्रो कामाच्या दरम्यान पॅरापेट भिंत कोसळून दोन लोकांचा मृत्यू झाला आणि फक्त पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. यावरून सरकारची जबाबदारी आणि नियोजन संदिग्ध ठरते. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, सत्ताधारी पक्षाने पायाभूत सुविधा नीट विकसित केल्या नाहीत; कोस्टल रोडसारखी काही कामं चांगली असली तरी त्यावर मोठा खर्च योग्य आहे का?, हा प्रश्न उपस्थित आहे. आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडी प्रकल्पावरीलही टीका केली. त्यांनी म्हटले की, मोठा पूल बनवला गेला, पण त्यावर इतका खर्च का केला गेला?, त्याची चौकशी झाली का? शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळत नाही, नोकर्‍या नाहीत, शहरात पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत, अशा परिस्थितीत राज्यातील कामकाज पारदर्शक नाही. म्हणूनच विरोधी पक्षाने चहापानाला बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Feb 22, 2026 04:24 PM