BMC Election : ज्युनिअर ठाकरे मैदानात उतरले; मुंबई पालिका निवडणुकीसाठी अमित – आदित्यने कंबर कसली

BMC Election : ज्युनिअर ठाकरे मैदानात उतरले; मुंबई पालिका निवडणुकीसाठी अमित – आदित्यने कंबर कसली

| Updated on: Jun 05, 2025 | 1:50 PM

सीनियर ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच ज्युनिअर ठाकरे बंधु मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेले बघायला मिळाले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ज्युनिअर ठाकरे मैदानात उतरले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई मनपाची जबाबदारी आहे. तर मनसेकडून अमित ठाकरे देखील मनपा निवडणुकीसाठी अॅक्टिव झालेले आहेत.

एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे हे राजकारणात एकत्र येणार का? याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे दोन्ही ज्युनिअर ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे. आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काही उपक्रम हाती घेत दोन्ही ज्युनिअर ठाकरेंनी कार्यक्रम सुरू केलेले दिसले. तरी पक्षांतर्गत बैठकांचा सपाटा आता अमित ठाकरे यांनी लावला आहे. पक्षाचं कार्यकाय राजगड येथे मुंबईच्या विभागवार बैठकांचं आयोजन केलं जात आहे. त्यातून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये काय स्थिती आहे, याचा आढावा अमित ठाकरे घेताना दिसत आहेत.

Published on: Jun 05, 2025 01:50 PM