Kolhapur : 15 दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा पावसाची दमदार हजेरी
पीक मशागतीनंतर वाढही जोमात सुरु झाली होती. त्यामुळे खरिपाच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच गुरुवारी पु्न्हा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना तर धोका निर्माण झाला आहे पण जनजीवनही विस्कळीत झाले आहे. गुरुवारी सांयकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली होती.
कोल्हापूर : जुलै महिन्यात पावसामध्ये सातत्य राहिल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूरसह राज्यात पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे खरीप हंगामातील कामांनी गती घेतली होती. पीक मशागतीनंतर वाढही जोमात सुरु झाली होती. त्यामुळे खरिपाच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच गुरुवारी पु्न्हा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना तर धोका निर्माण झाला आहे पण जनजीवनही विस्कळीत झाले आहे. गुरुवारी सांयकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली होती. यंदा हंगामाच्या सुरवातीला पावसाने उघडीप दिली तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. असे असताना आता पुन्हा पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Published on: Aug 03, 2022 07:56 PM
