Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका

Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका

| Updated on: Aug 23, 2026 | 8:45 PM

छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबामागे आता फक्त त्यांचे भयाण घर आणि शेरू नावाचा एक श्वान उरला आहे. मालकांच्या आठवणीने व्याकुळ झालेला शेरू गेल्या तीन दिवसांपासून तळमळत होता. शेरू घरात एकटाच होता आणि खिडकीपाशी कुणी आले की तो मालक परत आले असतील या आशेने भुंकत […]

छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबामागे आता फक्त त्यांचे भयाण घर आणि शेरू नावाचा एक श्वान उरला आहे. मालकांच्या आठवणीने व्याकुळ झालेला शेरू गेल्या तीन दिवसांपासून तळमळत होता.

शेरू घरात एकटाच होता आणि खिडकीपाशी कुणी आले की तो मालक परत आले असतील या आशेने भुंकत होता. त्याला भूक लागली असली तरी, तो बिस्कीट खात नव्हता कारण त्याला कुणालच्या आईने बनवलेल्या खास खिचडी किंवा अंड्याच्या ऑम्लेटची सवय होती. शेरूची ही अवस्था पाहून शेजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते आणि या मुक्या जिवाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांना पडला होता. अखेर आज दुपारच्या सुमारास पेट लव्हर असोसिएशनने शेरूची सुटका केली. मात्र, शेरू अजूनही चांदगुडे कुटुंबाच्या येण्याकडे डोळे लावून बसला आहे.

Published on: Aug 23, 2026 8:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us