Manikrao Kokate : तो माझ्यापेक्षा जास्त हुशार म्हणून… पत्रकारांचा एक सवाल अन् कोकाटे रोहित पवारांवर भडकले

Manikrao Kokate : तो माझ्यापेक्षा जास्त हुशार म्हणून… पत्रकारांचा एक सवाल अन् कोकाटे रोहित पवारांवर भडकले

| Updated on: Jul 22, 2025 | 3:14 PM

सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. जाहिरात स्किप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात का? रोहित पवारांचा माणिकराव कोकाटेंना सवाल

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेचे विधानसभेत रमी खेळतानाचे व्हिडीओ रोहित पवार यांनी ट्वीट केले. यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून एकच टीकेची झोड उठवण्यात आली. या आरोपांवर बोलताना कोकाटेंनी मी रमी खेळत नव्हतो तर रमीची जाहिरात स्कीप करत होतो असे म्हणत आरोप फेटाळून लावले. यानंतर रोहित पवारांनी पुन्हा दोन व्हिडीओ ट्वीट करत जाहिरात स्किप करायला 48 सेकंद लागतात का? असा सवाल केला. पत्रकारांनी यावरून सवाल केला असता माणिकराव कोकाटे रोहित पवारांवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

‘मला लागतो जाहिरात स्किप करायला तेवढा वेळ त्याला नसेल लागत. तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे.’, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांच्या ट्विटनंतर उत्तर देताना भडकले पुढे कोकाटे असेही म्हणाले, तो जास्त हुशार असल्यामुळे त्याचा प्रोब्लेम कमी आहे. मी कमी हुशार असल्यामुळे माझा प्रोब्लेम जास्त आहे. तर विरोधकांकडून होणाऱ्या राजीमान्याच्या मागणीवरून बोलताना कोकाटे असेही म्हणाले की, मी चौकशीसाठी मागणी केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी काय ट्वीट केलं हे चौकशीअंती सर्व बाहेर येईल. त्यावेळी मी सभागृहात रमी खेळलो हे सिद्ध होईल तेव्हा मी माझ्या पदाचा राजीनामा देणार, असं माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांच्या नव्या ट्वीटवर उत्तर दिलं आहे.

Published on: Jul 22, 2025 03:14 PM