Narendra Modi | जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे, नगरमधील घटनेवर मोदींकडून शोक व्यक्त

| Updated on: Nov 06, 2021 | 6:34 PM

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरमधील दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केलीय. महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.

Follow us on

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरमधील दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केलीय. महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.

दरम्यान, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. तर दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिलीय.