Ajit Pawar : बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे, अजित पवारांचा गोपीचंद पडळकरांना सल्ला
अजित पवारां(Ajit Pawar)वर जबाबदारी टाकली तर ते राज्य विकून खाईल, अरे काय बोलता तुम्ही? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी पवारांवर टीका केली होती, त्याला अजित पवारांनी प्रत्त्युत्तर दिलं.
काही जण म्हणतात, की अजित पवारां(Ajit Pawar)वर जबाबदारी टाकली तर ते राज्य विकून खाईल, अरे काय बोलता तुम्ही? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी पवारांवर टीका केली होती, त्याला अजित पवारांनी प्रत्त्युत्तर दिलं. मागच्या तीस वर्षांपासून जनता आणि राजकीय क्षेत्रातलं लोक आपल्याला ओळखतात, असंही ते म्हणाले. बोलताना तारतम्य बाळगावं, असंही ते यावेळी म्हणाले.
Published on: Dec 27, 2021 07:44 PM
