Ajit Pawar : का गं कुठं गेली होती? मी आताच विचारतो बायकोला… पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर दादांचं मिश्कील उत्तर

Ajit Pawar : का गं कुठं गेली होती? मी आताच विचारतो बायकोला… पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर दादांचं मिश्कील उत्तर

| Updated on: Aug 21, 2025 | 2:25 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा हे त्यांच्या स्पष्ट आणि थेट चोखपणे उत्तर देण्याच्या शैलीवरून नेहमीच चर्चेत असतात. अशातच वर्ध्यात असताना त्यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

 वर्ध्यात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासंदर्भात एक सवाल केला. यावरून अजित दादांनी पत्रकारांना फटकारत मिश्कील वक्तव्य केलं. अजितदादा यांनी नागपूर येथील रेशीमबागेत जाणे टाळले मात्र त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात त्यांना पत्रकारांनी सवाल केला असता अजित पवार म्हणाले, माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं असते? हे मला मिनीट टू मिनीट मला माहिती नसतं, मी आता विचारतो बायकोला का गं कुठं गेली होती? असं अजित पवारांनी मिश्कीलपणे भाष्य केले.

प्रश्न विचारण्याचा पत्रकारांचा अधिकार आहे. पण काय प्रश्न विचारायचे? असं म्हणत अजित पवारांनी पत्रकार अन् माध्यम प्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले, अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये… आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय ते विचारायचं तर ब्रेकींग न्यूज काय देता येईल… अजित पवार काय म्हणाले.. मग तुमचं मत काय यावर? असे काय चाललंय असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांची मिश्कीलपणे खिल्ली उडवली.

Published on: Aug 21, 2025 02:25 PM