NCP : फोन टॅपिंगवरून रोहित पवारांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांवर आरोप अन् अजितदादांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, फोन टॅपिंगची भीतीने मंत्री स्वतःहून फोन बंद ठेवत असावेत. पवार यांनी हा आरोप ट्विटद्वारे केला असून, आरोप करण्यासाठी पुरावे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले आहेत.
काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येतात, असं रोहित पवारांनी म्हटलं. फोन टॅप होत असल्यामुळे मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा आहे, असं रोहित पवार म्हणाले. केवळ चर्चा आहेत की वास्तव हे या काळात कळेल असं रोहित पवारांनी म्हटलं. ट्वीट करत रोहित पवार यांनी आरोप केलाय. दरम्यान, रोहित पवारांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर अजित पवारांनी आपली थेट प्रतिक्रिया दिली आहे. आरोप करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणीही काहीही आरोप करू शकतात. परंतु आरोप करणाऱ्यांनी काही पुरावे दिलं पाहिजे. आरोप करायचे आणि पुरावे काहीच द्यायचं नाहीत. काहीतरी दाखवलं पाहिजे. त्या आरोपामध्ये काहीतरी तथ्य, पुरावा काहीतरी पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांच्या ट्वीटवर भाष्य केले आहे.
Published on: Jul 25, 2025 07:54 PM
