उचलली जीभ लावली टाळ्याला, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य चुकीचं : अजित पवार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सातत्याने सुरु असतात.
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सातत्याने सुरु असतात. पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) तोंडावर ते अधिकच तीव्रतेने होताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अजित पवार यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप पाटील यांनी केलाय. पाटील यांच्या या आरोपाला आता खुद्द अजित पवार यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आपण काय बोलतो याचं भान बाळगलं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं चालत नाही’, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय.
