Ajit Pawar : शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी देऊ; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी देऊ; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Jun 12, 2025 | 4:19 PM

शेतकऱ्यांना योग्य वेळ आल्यावर कर्ज माफी देण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

सरकार शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी देऊन त्यांना दिलासा देईल. एवढेच नाही तर लाडक्या बहिणींनाही दरमहा 1500 रुपये देण्यास सरकार तत्पर आहे, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. आज अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. बच्चू कडू यांच्याकडून मागील 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या सर्व प्रश्नांवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं.

यावेळी बोलतं पवार म्हणाले की, सरकार खते व बी बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार व कंपन्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुकानदारांचे परवाने रद्द केले जातील. तर कंपन्यांवरही योग्य ती कारवाई केली जाईल. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी देखील अजित पवार यांनी यावेळी दर्शवली.

Published on: Jun 12, 2025 04:19 PM