Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट

Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट

| Updated on: Jun 17, 2025 | 6:32 PM

Indrayani Bridge Collapse Updates : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जखमींची भेट घेतली.

पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 40 ते 45 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यांना वाचवण्यात यश आले. सुमारे 38 जण जखमी झाले होते. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जखमींच्या प्रकृतीची चौकशी करत रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार सुनील शेळके व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हंटलं की, घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा हलवण्यात आल्या आणि तिथे लोकांना कशा प्रकारे वाचवता येईल, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला. आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह इतर विभागांच्या टीमने यामध्ये जलद गतीने सगळ्या गोष्टी केल्यामुळे अनेकांना या संकटातून बाहेर काढू शकलो. अनेकांचा जीव वाचवू शकलो. परंतु, दुर्दैवाने चार जणांना प्राण गमवावे लागले, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Published on: Jun 17, 2025 06:32 PM