सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचं खुमासदार भाषण, अधिकाऱ्यांसह मंत्री, आमदार खदाखदा हसले, पाहा नेमकं काय झालं

सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचं खुमासदार भाषण, अधिकाऱ्यांसह मंत्री, आमदार खदाखदा हसले, पाहा नेमकं काय झालं

| Updated on: Aug 03, 2025 | 4:27 PM

सप्तखंजेरी वादक आणि समाजप्रबोधक सत्यपाल महाराज यांनी अकोल्यात सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन समारंभात केलेल्या खुमासदार भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले.

गणेश सोनोने, प्रतिनिधी

सप्तखंजेरी वादक आणि समाजप्रबोधक सत्यपाल महाराज यांनी अकोल्यात सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन समारंभात केलेल्या खुमासदार भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना उपस्थितांना हसवले. ते म्हणाले, “आजकाल गरीबांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर म्हणतात, ‘पोरगी पळून गेली,’ पण मोठ्या घरच्या मुलीने तेच केलं तर त्याला ‘राष्ट्रीय एकता’ म्हणतात!” या वाक्याने सभागृहात हास्याचा माहोल निर्माण झाला.

या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे आमदार हरीश पिंपळे, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि समाजकल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सत्यपाल महाराजांच्या खुसखुशीत आणि मार्मिक भाषणाने सर्व उपस्थित खदाखदा हसले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमाचा आढावा गणेश सोनोने यांनी घेतला आहे.

Published on: Aug 03, 2025 04:26 PM