Akola : भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या  शिव्या, ऑडिओ व्हायरल अन् थेट गृहमंत्र्यांकडे एकच मागणी

Akola : भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन् थेट गृहमंत्र्यांकडे एकच मागणी

| Updated on: Apr 21, 2025 | 4:21 PM

आमदार सोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी अकोला जिल्हातील भाजपच्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे.

अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अकोल्यातील भारतीय जनता पक्षाचे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातीलच बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराकडून भाजप आमदाराला शिवीगाळ करण्यात आल्याचा हा प्रकार असून शिवीगाळ केल्याचा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आरोप केला आहे. कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत जनावरांचं वाहन सोडून दिलं असल्याचा आरोप भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी केला आहे. शिवीगाळ करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी ठाणेदार अर्थात पोलीस अधिकाऱ्याची तक्रार थेट राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी एक ऑडिओ क्लिप देवेंद्र फडणवीस यांना पाठवून शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई कऱण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

Published on: Apr 21, 2025 04:21 PM