CM Relief Fund Maharashtra : दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडेच जाहीर

CM Relief Fund Maharashtra : दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडेच जाहीर

| Updated on: Dec 11, 2025 | 5:55 PM

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खर्चावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी अब्जावधी रुपये निधीमध्ये जमा केले असताना, सरकारने केवळ ७५ हजार रुपये खर्च केले असल्याचा दावा दानवेंनी केला.

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त ७५ हजार रुपये खर्च केले, असे म्हटले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना “दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख” असे संबोधले आणि हा निधी सरकारला त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला “इलेक्शन फंड” वाटतो का, असा प्रश्न उपस्थित केला. तर मुख्यमंत्री कार्यालयाने अंबादास दानवेंच्या आरोपांना तातडीने उत्तर दिले. दानवेंनी ट्वीट केलेली आकडेवारी चुकीची असल्याचे CMO ने म्हटले. केवळ एका महिन्यातील आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एकूण ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये इतकी मदत वितरित करण्यात आली आहे. हा खर्च दैनंदिन पातळीवर होत असल्याने त्याची रक्कम दररोज वाढत असते, असेही स्पष्ट करण्यात आले.

Published on: Dec 11, 2025 05:55 PM