Walmik Karad : जेलमधून थेट वाल्मिक कराडचा फोन अन्… ‘या’ नेत्यानं खळबळच उडवली, केला मोठा दावा

Walmik Karad : जेलमधून थेट वाल्मिक कराडचा फोन अन्… ‘या’ नेत्यानं खळबळच उडवली, केला मोठा दावा

| Updated on: Jul 26, 2025 | 3:00 PM

राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण यावेळी दानवेंनी वाल्मिक कराडबद्दल अत्यंत मोठा दावा करत गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे. कोठडीत असणाऱ्या कराडसंदर्भात विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणत एकच खळबळ उडवून दिली. वाल्मिक कराड आजही जेलमध्ये असताना अनेक गोष्टी करत असतो, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तर माझ्यासमोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला, असं म्हणत अंबादास दानवेंनी मोठा दावा केल्याचे समोर आले आहे.

वाल्मिक कराड कोणाचा पाठीराखा आहे हे फक्त परळी किंवा बीडला नाही तर अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. एकदा तर माझ्यासमोर एक माणूस बसला होता. त्याला कराडचा फोन आला मला आश्चर्य वाटलं. अशा गोष्टी ज्यावेळी होतात तेव्हा मोठा कोणाचा तरी पाठिंबा असतो. कराडला धनंजय मुंडेंचा पाठिंबा आहे हे लपून राहिलेलं नाही’, असा गंभीर आरोप करत दानवेंनी मोठा खळबळजनक दावा केलाय.

Published on: Jul 26, 2025 03:00 PM