Maharashtra Farmer Aid : कंजूस… पॅकेज हा जादुई शब्द… विरोधकांच्या आरोपांवर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट…

Maharashtra Farmer Aid : कंजूस… पॅकेज हा जादुई शब्द… विरोधकांच्या आरोपांवर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट…

| Updated on: Dec 11, 2025 | 4:22 PM

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतील अल्प खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होऊनही ती मिळत नसल्याचा आरोप केला. यावर मंत्री शंभुराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले की, शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांची मदत देण्यासाठी जीआर निर्गमित झाले असून, पैसे संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात आले आहेत. ही आकडेवारी रेकॉर्डवर उपलब्ध आहे.

शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अंबादास दानवे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीत लोकांनी अब्जावधी रुपये दिल्याचे, मात्र त्यातून केवळ 75 हजार रुपये खर्च झाल्याचे म्हटले. देवेंद्र फडणवीस यांना दानशूर कंजूष प्रमुख असे संबोधत, हा पैसा उद्योजकांनी दिलेला इलेक्शन फंड आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याची तक्रार दानवे यांनी केली. या आरोपांवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, कालपर्यंत 21 हजार कोटी रुपयांचे जीआर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी निर्गमित करण्यात आले आहेत. हे पैसे संबंधित विभागांकडे वर्ग झाले असून, ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे. रोहित पाटील यांना याबद्दल माहिती हवी असल्यास, त्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन जिल्हावार आकडेवारी घ्यावी, असे देसाई यांनी नमूद केले.

Published on: Dec 11, 2025 04:22 PM