Ambadas Danve: …तर आम्ही त्यांच्यासोबत नसू, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान अंबादास दानवे यांचं मोठं विधान
अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास शिवसेना त्यांच्यासोबत नसेल, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातील पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे
शिवसेना उबाठेचे नेते अंबादास दानवे यांनी एका महत्त्वाच्या राजकीय प्रश्नावर आपले मत व्यक्त केले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष भविष्यात एकत्र आल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) त्यांच्यासोबत नसेल, असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच पुण्यामध्ये अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात झालेल्या डिनर बैठकीमुळे दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत इतर पक्षांशी चर्चा केल्याचेही दानवे यांनी नमूद केले, परंतु भविष्यात काय होईल हे आताच सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. मात्र, जर दोन्ही पवार गट एकत्र आले तर शिवसेना त्यात सहभागी होणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले.
Published on: Dec 26, 2025 01:59 PM
