पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; अंबादास दानवेंचा संजय गायकवाडांवर घणाघात

पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; अंबादास दानवेंचा संजय गायकवाडांवर घणाघात

| Updated on: May 24, 2026 | 5:36 PM

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ आणि ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “संजय गायकवाड फक्त पुस्तकाचं कव्हर पाहतात, पण आत काय लिहिलं आहे हे ना वाचतात ना समजून घेतात. फक्त कव्हर पेज पाहून प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे.” दानवे यांनी पुढे सांगितलं की, “गायकवाड यांनी किमान पुस्तकांची प्रस्तावना तरी वाचायला हवी होती. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या पुस्तकांमधून कोणते विचार मांडले आहेत, हे त्यांना माहितीच नाही.” अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर आक्षेप घेत पुस्तक वितरण करणारे प्रशांत आंबी यांना कथित शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र आता पुन्हा पुस्तकांवर बंदीची मागणी केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

Published on: May 24, 2026 5:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us