खासदार ठाकरेंच्या सेनेचे, वाढदिवसाला फोन मात्र अमित शाहांचा! काय आहे प्रकार?

खासदार ठाकरेंच्या सेनेचे, वाढदिवसाला फोन मात्र अमित शाहांचा! काय आहे प्रकार?

| Updated on: Jul 28, 2025 | 5:30 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या. या फोन कॉलची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शाह यांनी आष्टीकर यांना, “तुम्ही कितवा वाढदिवस साजरा करत आहात?” असा प्रश्न विचारला. आष्टीकर यांचा वाढदिवस रविवारी होता, आणि त्याच दिवशी हा फोन कॉल आला.

त्याचवेळी, रविवारी उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस साजरा झाला, परंतु अमित शाह यांनी त्यांना शुभेच्छा न देता थेट त्यांच्या खासदाराला फोन करून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे निमित्त असले तरी शाह यांचा आष्टीकर यांना आलेला हा फोन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांचा हा प्रारंभ असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jul 28, 2025 05:30 PM