अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर मतांच्या राजकारणासाठी वंदे मातरम विसरल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील एका जाहीर सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेसने केवळ मतांसाठी राष्ट्रीय भावनांचा अनादर केला आहे.

अमित शाह यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “जर थोडी तरी लाज शिल्लक असेल, तर काँग्रेसने देशाची माफी मागावी.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. शाह यांनी पुढे असेही म्हटले की, काँग्रेस मुख्यालयात मोठे पाप घडले आहे, जे देशाच्या संस्कृती आणि मूल्यांना धरून नाही. या आरोपांमुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शाह यांनी उपस्थित केलेल्या वंदे मातरमच्या मुद्द्यामुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे. याआधीही अनेकदा भाजप नेत्यांनी काँग्रेसवर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. आता अमित शाह यांनी थेट वंदे मातरमचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले आहे. व्हायरल व्हिडीओनुसार पक्षातील नेत्याने माध्यमांना सांगितले की “जरी सोनिया गांधींनी बंद करण्यास सांगितले तरी आम्ही असे काही केले नाही आम्ही संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केले.”